सांगली/प्रतिनिधी
तंदुरुस्त आरोग्यासाठी सायकलिंग आता काळाची गरज आहे. यासाठी जनतेमध्ये सायकलिंग बद्दल जनजागृती करण्यासाठी 104 MY FM सांगली यांच्यावतीने तीन ते पाच फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत विश्रामबाग शिवाजी स्टेडियम सांगली या ठिकाणी सायकलिंग सांगली विथ RJ हर्षदा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यामध्ये धमाल मज्जा मस्ती वेगवेगळे कार्यक्रम व बक्षीस देखील असणार आहेत. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान RJ हर्षदा व 104 MY FM सांगलीच्या संपूर्ण टीम कडून सांगलीकरांना केलं आहे.