कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या बैठकीत सन २०२० चे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये चंद्रकांत मिठारी ( दै.महासत्ता व्यवस्थापक ) यांना जीवन गौरव पुरस्कार, राजू पाटील ( दैनिक पुढारी ) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार प्रिंट मिडिया, विजय केसरकर (एबीपी माझा) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया, दगडू माने ( दैनिक पुण्यनगरी ) जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार व निवास कांबळे यांना जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
याशिवाय तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार – चंदगड – लक्ष्मण व्हन्याळकर ( तरुण भारत ), आजरा – विकास सुतार ( महासत्ता ), गडहिंग्लज – गणेश बुरुड ( सकाळ ), भुदरगड – शैलेंद्र उळेगड्डी ( पुण्यनगरी ), राधानगरी – रवींद्र पाटील ( पुढारी ), शाहुवाडी – श्रीमंत लष्कर ( पुढारी ), करवीर दक्षिण विभाग – राम पाटील (एस न्यूज ), करवीर उत्तर विभाग – सतीश पाटील ( तरुण भारत ) हातकणंगले पश्चिम विभाग – संतोष सणगर ( तरुण भारत ), हातकणंगले पूर्व विभाग – सुहास जाधव ( लोकमत ), पन्हाळा पश्चिम विभाग धनाजी पाटील ( सकाळ ), पन्हाळा पूर्व विभाग – संजय पाटील (सकाळ),कागल मुरगूड विभाग -प्रकाश तिराळे ( सकाळ),कागल विभाग- सागर लोहार (तरुण भारत), शिरोळ-निनाद मिरजे (पुण्यनगरी), हातकणंगले दक्षिण विभाग – संजय साळुंखे ( पुढारी ).


