महालक्ष्मीनगर वाचनालयाचा सुवर्ण महोत्सवी दिन साजरा ;वाचनालयाच्या प्रगतीसाठी मोलाची मदत करणार -नगराध्यक्ष मोहनलाल माळी

वडगांव / प्रतिनिधी
   पन्नास वर्षांपूर्वी म्हणजेच 1 जानेवारी 1970 रोजी वडगांव नगरपालिकेने महालक्ष्मीनगर वाचनालयाची केली होती. याच वाचनालयाचा सुवर्ण महोत्सवी दिन साजरा करण्यात आला . यावेळी अभिजात वाचक व पदाधिकारी यांनी अत्यंत घरगुती व सौहार्दपूर्ण वातावरणात सुवर्ण महोत्सवी दिन साजरा केला.

      अध्यक्षस्थानी वाचक , व जेष्ठ नागरिक समितीचे विवेक आयरेकर होते . कार्यक्रमास पाहुणे म्हणुन नगराध्यक्ष मोहनलाल माळी, माजी उपनगराध्यक्ष सुनील हुक्केरी, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण उपस्थित होते.
     प्रास्ताविक संयोजक विकास आयरेकर यांनी केले. प्रतिमापूजन राष्ट्रवादी शहराध्यक्ष फिरोज बागवान यांनी केले. याप्रसंगी निवडक वाचकांचा सत्कार नगराध्यक्ष यांचे हस्ते पुस्तक व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. वाचकांच्या वतीने विवेक कमलाकर, फिरोज बागवान, प्रीतम मुधाळे, धीरज शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
    सुनील हुक्केरी व नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी आपले विचार मांडताना वाचनालयाचे प्रगतीसाठी यापुढे मोलाची मदत करून वडगाव नगरीतील एक आकर्षण केंद्र होईल . अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास आयरेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल सुनील काशीद यांनी केले. या कार्यक्रमास उदय चौगुले, प्रकाश बेलेकर व अनेक वाचनप्रेमी लोकांनी उपस्थित राहून शोभा वाढविली .

error: Content is protected !!