वाढदिवसाच्या निमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार

हातकणंगले / प्रतिनिधी
    मजले (ता. हातकणंगले ) गावचे आशिष कोठावळे यांनी स्वःताचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून तोच निधी गावातील कोरोना योद्धांसाठी खर्च केला . वाढदिवसाच्या निमित्य मजले गावांमध्ये कोरोना काळात काम केलेल्या गावातील सर्व डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी यांचा सन्मानपत्र, ग्रंथभेट व मास्क देऊन सत्कार करण्यात आला .
    यावेळी मजले गावांचे लोकनियुक्त सरपंच सिकंदर कोठावळे, ग्रामसेविका श्रीमती .व्ही. एस् .कुलकर्णी , आरोग्य अधिकारी श्रीमती सावर्डेकर , ग्रामपंचायतीचे सदस्य बाबासो पाटील , डॉ.अनिल अथणे, डॉ.सूरज सक्काणा, संदीप कांबळे, उद्योजक अविनाश पाटील, इंजिनिअर मोहन जाधव , लाटवडेकर , सामाजिक कार्यकर्ते सुनील कोठावळे , सचिन कोठावळे, अमित कोठावळे, अक्षय कोठावळे,संदेश जाधव उपस्थित होते.

error: Content is protected !!