गावठी पिस्टल विकणाऱ्या दोघांना अटक ;स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

कोल्हापूर / प्रतिनिधी
   गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या शिवाजी उर्फ संतोष नामदेव पाटील (वय वर्ष -28 , रा . कंदलगाव ता . करवीर ) व त्याचा साथीदार संदेश उर्फ रोहित शामराव पाटील (वय वर्ष -29 , रा . कोलोली ता . पन्हाळा ) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली . त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन राऊंड असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला . ही कारवाई गुरुवार दिनांक 1 रोजी आर के नगर येथील चित्रनगरीजवळ केआयटी कॉलेजकडे जाणाऱ्या मार्गावर केली . संशयित आरोपीना गोकुळ शिरगांव एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास सपोनि सुशांत चव्हाण करीत आहेत .
   ही कारवाई पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे ,अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तानाजी सावंत , सपोनि. सत्यराज घुले , पोहेकॉ. राजेश आडुळकर , अमोल कोळेकर , अजित वाडेकर , नितीन चोथे , संजय पडवळ , पो.ना. सागर कांडगावे , रामचंद्र कोळी , संतोष पाटील , रणजित कांबळे , अमोल कोळेकर ,संदीप कुंभार , रफिक आवळकर , नामदेव यादव , अमर वासुदेव यांनी केली .

error: Content is protected !!