संकटकाळी मदत करण्यात शिक्षक समितीचा सदैव पुढाकार -आम . राजुबाबा आवळे

हातकणंगले / प्रतिनिधी
     प्राथमिक शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद व अतुलनीय असुन कोरोनाच्या महामारीसह कोणत्याही संकटकाळी मदत करण्यात समितीचा सदैव पुढाकार असतो . असे मत आमदार राजुबाबा आवळे यांनी व्यक्त केले.हातकणंगले येथे प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कोविड सेंटरला ऑक्सिजन जनरेटर व फळे भेट प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.पंचायत समीतीचे उपसभापती राजकुमार भोसले अध्यक्षस्थानी होते. तहसिलदार प्रदीप उबाळे, तालुका आरोग्य अधिकारी सुहास कोरे, गटशिक्षणाधिकारी प्रविण फाटक, शिक्षण विस्तार अधिकारी नम्रता गुरसाळे प्रमुख पाहुणे होते.

    यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील म्हणाले,शिक्षक समितीने केलेल्या आवाहनाला शिक्षकातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १५ लाखांहून अधिक निधी जमा होत आहे.यातून जिल्हा परिषदेला सुसज्ज अॅम्बुलन्स व १२ तालुक्यातील कोविड सेंटरला ऑक्सिजन जनरेटरचे वाटप सुरू आहे. तालुकाध्यक्ष संजय कुंभार यांनी स्वागत केले. अधिक्षक श्री.भुते, सिद्राम भानसे, प्रकाश पाटील, गुंडू पाटील, प्रकाश धातुंडे, सहदेव हारगे, जी.एस.पाटील,बालाजी पांढरे, दीपक गायकवाड, गजानन कोले,धनाजी शेवाळे , सरचिटणीस विनायक तावरे , महादेव गायकवाड यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते.सागर पाटील यांनी आभार मानले.

error: Content is protected !!