इस्लामपूर / प्रतिनिधी
आगामी काळात आपली व आपल्या कुटूंबाची काळजी प्रत्येकाने घ्यावी. शासनाच्या आदेशाचे पालन करावे. असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपाचे युवा नेते सम्राट महाडिक यांनी केले. पेठ (ता. वाळवा ) येथे ‘माझ गाव, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत सिध्दगिरी मठ श्री . अदृश्य काडसिध्देश्वर महाराज व भारतीय जनता पक्ष, महाडिक युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीमध्ये प्रतिकारशक्ती टिकून राहण्यासाठी मोफत औषधाचे १० हजार बाटल्यांचे वाटप केले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सभापती जगन्नाथ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाडिक म्हणाले, सहा महिन्यांपासून देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. आता गावागावातही कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. याला वेळीच रोखणे आवश्यक आहे. यासाठी या औषधाचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष धनपाल माळी, उपसरपंच दिपक कदम, मोहन मदने, शंकर पाटील, विशाल शेटे, राहुल पाटील, अमीर ढगे, आनंदराव कदम, विकास दाभोळे, चंद्रकांत पवार, असिफ जकाते, भानुदास गुरव, भगवान कदम, कैलास माळी, धनंजय माळवदे, गोरख मदने, कृष्णात पाटील, माणिक पाटील, प्रदीप देशमाने, विश्वास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
