जयसिंगपूर /प्रतिनिधी
साहित्य सुधा कला , क्रीडा , शैक्षणिक , सांस्कृतिक मंच व ग्रामस्थांच्यावतीने चोवीसावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 27 डिसेंबर रोजी कोरोना महामारी मूळे वेबिनार स्वरूपात होणार आहे .संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत आहेत. अशी माहिती संमेलनाचे संयोजक पद्माकर पाटील ,विजय बेळंके ,प्रा.शांताराम कांबळे, रावसाहेब पुजारी , सचिव गोमटेश पाटील यांनी दिली. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत मा.प्राचार्य श्रीधर हेरवाडे करतील. स्वागताध्यक्ष विठ्ठल मोरे ( चेअरमन भरत अर्बन बँक जयसिंगपूर) आहेत.
संमेलनाची सुरुवात सिध्देश्वर मंदिरात सकाळी ९ वाजता डॉ.धवल पाटील , डॉ.वैशाली पाटील , डॉ. सुकुमार मगदूम, डॉ. शुभांगी मगदूम यांच्या हस्ते फोटो पूजनाने होईल. या समारंभात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो . त्यामध्ये समाजामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणारया व्यक्तींना दे.भ.डॉ. रत्नापाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार यावेळी मा.शंकरराव पुजारी ( ज्येष्ठ कुस्ती समालोचक कोथळी ) यांना तर ज्येष्ठ साहित्यिक पी.बी.पाटील साहित्यरत्न पुरस्कार आदिनाथ कुरुंदवाडे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक (अब्दूललाट ) आणि कृषी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्यासाठी शेतकरी राजा पुरस्कार भास्कर शिंदे (धरणगुत्ती ) यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात नवे कृषी कायदे वास्तव व अपेक्षा या विषयावर परिसंवाद प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या चर्चासत्रात डॉ.व्ही.एन.शिंदे कोल्हापूर, डॉ.मोहन पाटील जयसिंगपूर प्रमुख वक्ते आहेत. त्याचबरोबर विशेष कार्यक्रम सुनिल स्वामी (इचलकरंजी ) यांचे निमशिरगाव संविधान गाव जनजागृती होणार आहे.
तिसऱ्या सत्रात प्रा. डॉ. रफिक सुरज (हुपरी ) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींचे काव्य संमेलन होणार आहे. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . सुनंदा शेळके करतील. हे संमेलन गूगल मीटद्वारे होणार आहे.
