पाण्याच्या टाकी वरून तोल जाऊन युवकाचा मृत्यू

आळते/ प्रतिनिधी

    कुंभोज तालुका हातकणंगले येथील वैभव बापुसो दानोळे या युवकाचा रविवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला. नेज हद्दीतील पाणीपुरवठा संस्थेच्या पाण्याच्या टाकीवरून पाय घसरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद हातकंणगले पोलिस ठाण्यात झालेली आहे
   या बाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी वैभव दानोळे हा येथील पाणी पुरवठा संस्थांच्या पंप हाऊस वरती ऑपरेटर म्हणून काम करत होता पहाटेच्या वेळी पाण्याच्या टाकीतील पाण्याची पातळी पाहण्यासाठी जिन्यावरून टाकीवर चढला असता तोल जाऊन खाली कोसळला, यावेळी त्या मुक्कामार लागला होता. यावेळी शेजारी पंप हाऊस मध्ये वडील बापुसो दानोळे होते. मुलगा अजून आला नाही म्हणून पाहण्यासाठी वडील गेला असता त्यांना मुलगा खाली पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ घराशेजारील नातेवाईकांना बोलावून उपचारासाठी प्रथम येथील खाजगी त्यानंतर ग्रामीण रुग्णालय हातकलंगले येथे दाखल केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहे.
यावेळी पाणीपुरवठा व्हाईस चेअरमन दिलीप शेळके पाटील, संचालक तात्यासाहेब बिरंजे, माजी सचिव विठ्ठल बिरंजे, सचिव अशोक पवार, सुरेश संकाण्णा व ग्रामस्थ उपस्थित होते.  

error: Content is protected !!