तालुक्यामध्ये व इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करणार -मा. आम. आवळे

इचलकरंजी /प्रतिनिधी
     हातकणंगले राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राजीव आवळे यांची कार्यकर्त्यांनी भेट घेवुन शुभेच्छा दिल्या . यावेळी हातकणंगले तालुक्यामध्ये व इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले . तसेच कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव नसल्याचे सांगुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्रित आणून पुढची रणनीती आखणार असल्याचे माजी आमदार आवळे यांनी सांगितले .

     याप्रसंगी संतोष वडेर ( तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस. हातकणंगले ) , प्रसाद अनुरकर( विधानसभा अध्यक्ष, इचलकरंजी ) ,अजित मोरे ( विधानसभा अध्यक्ष, हातकणंगले ) , शाहबाज कलंदर मकानदार( तालुका कार्याध्यक्ष ) , धर्मराज कृष्णात पाटील (तालुका उपाध्यक्ष ) , स्वप्नील अनिल शिंदे( तालुका उपाध्यक्ष ) , रमेश आनंदा दबडे (तालुका सरचिटणीस ) ,
अजित कृष्णात खोत ( तालुका चिटणीस ) ,हर्षद तानाजी शिंदे ( तालुका चिटणीस ) आदि मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!