हातकणंगले प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंडस्ट्रियल इस्टेट माणगाववाडी येथील सुहान मागासवर्गीय सह. संस्था, रविचंद्र महीला मागासवर्गीय सह. संस्था, शाहू राजे मागासवर्गीय सह.संस्था, होलार समाज मागासवर्गीय सह.संस्था व विश्वशांती मागासवर्गीय सह.संस्था या मागासवर्गीय औद्योगिक सह. संस्थांना आज मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी भेट दिली. यावेळी काही मागासवगीर्य सह. सस्था या पूर्ण आहेत. तर काही संस्था या निधी न मिळाल्यामुळे अपूर्ण स्थितीत आहेत.

यामधील पूर्ण झालेल्या संस्थांना भेट दिली असता उद्योगाला येणाऱ्या अडचणी या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. काही संस्था अनुदान न मिळाल्यामुळे अर्धवट स्थितीत आहेत.

या सर्व अडचणी शासनाकडे मांडून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे व अर्धवट स्थितीत असलेल्या संस्थांनाही सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या अनुदान संदर्भातही शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ. मिणचेकर यांनी दिले. यावेळी सचिन कांबळे, कुमार कांबळे, शीतल केटकाळे, प्रमोद कदम, संदीप कांबळे, श्रीराम कुळकर्णी, अभिजीत कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर व उद्योजक उपस्थित होते.