जवाहरनगरात बंद घरात दीड लाखाची चोरी ; परिसरातील नागरिकांमध्ये घबराट

इचलकरंजी / प्रतिनिधी
       जवाहरनगर , इचलकरंजी येथील बंद घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यानी कडीकोयंडा उचकटून चोरी केली . चोरीत तब्बल दिड लाखाचा ऐवज लंपास केला. भरवस्तीत ही चोरी झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. चोरीची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.
       मल्लीकार्जुन चंदशेखर गंजाळ हे कापड विक्रेते असुन ते जवाहरनगरमध्ये एका खासगी हॉस्पीटलनजीक कुटूंबासह राहतात . दिवाळीच्या सणानिमित्य सहकुटूंब ते नातेवाईकांच्याकडे गेले होते. त्यामुळे त्यांच्या घरी राहण्यास कोणीही नव्हते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला . घरातील कपाट फोडून त्यातील २० हजारांची रोकडसह सुमारे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केला. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.   

error: Content is protected !!