बोरपाडळे /प्रतिनिधी
कोल्हापुर येथील आंतभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्तसैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शां.कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

यावेळी डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक महावीर मुदबिद्रीकर यांनी पुष्पहार अर्पण केला .यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संजय सौंदलगे यांनी ‘वाचाल तर वाचाल’ या विषयावर ऑनलाईन वेबिनार सादर केले. या सादरीकरणात त्यांनी डॉ.अब्दुल कलाम यांचे जीवनप्रसंग सांगतानाच वाचनाने व्यक्तिमत्त्व कसे बहुश्रुत होते याचे सविस्तर विवेचन केले.
ग्रंथपाल मृदुला शिंदे यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन भरवले. त्याचा उपस्थित शिक्षकांनी लाभ घेतला . शाळेतील शिक्षक सदाशिव ऱ्हाटवळ यांनी वेबिनारचे संयोजन केले. यावेळी मुख्याध्यापक बी.ए. लाड, वृषाली कुलकर्णी, एस.पी.पाटील,सुरेखा पोवार, सोनाली महाजन ,प्रशांत भोसले,सागर मनुगडे,नंदा बनगे,अनुपमा पन्हाळकर, दिनकर शिंत्रे,संतोष पोवार, सुनीता सप्ताळ आदी मान्यवर उपस्थित होते.