वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशस्वी फाउंडेशनच्या वतीने कोडोली व वारणा परिसरातील महीलांसाठी नवरात्रौत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (दि.१७) रोजी झालेल्या “ऑनलाइन झूम मीटिंग” च्या माध्यमातून “आकर्षक मेणबत्ती” स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यशस्वी फौंडेशनच्या अध्यक्षा विनिता पाटील यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून महीलांना एक खुले व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, महीलांनी आपल्या कलागुणांसह ऑनलाईनच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनावे,व स्वतःच्या उद्योग व्यवसायांची निर्मिती करावी’ याच उद्देशाने यशस्वी फाउंडेशनची निर्मिती केली असलेने सर्व महीलांनी एकत्र येवुन आपल्या अंगभुत कलागुणांचा विकास साधावा. यावेळी सहभागी स्पर्धक महीलांचे त्यानी कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कुलच्या प्राचार्या माधवी के. यांचे विशेष माग॔दश॔न लाभले
या ऑनलाईन स्पर्धांमधुन विविध स्तरातील महीलांचा मोठ्या उत्साहाने सहभाग होता. यामध्ये स्पर्धक महीलांनी वेगवेगळ्या आकष॔क मेणबत्त्या तयार करून संयोजकांची वाहवा मिळविली.
