मिरचीच्या दरात २० टक्क्यांनी घसरण; मागणी वाढली

गडहिंग्लज

प्रतिवर्षी मिरचीच्या दराची झळ सर्वाना बसते. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने मिरची पीक जोमदार आली आहे. गतवर्षीपेक्षा यावेळी बाजारपेठेत २० टक्क्यांनी मिरचीचा दर कमी झाला आहे. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने वर्षभराच्या चटणीची जोडणा करण्यासाठी गडहिंग्लज आणि कर्नाटकातील सीमा भागातील मिरची घेण्यास महिला वर्गांनी सुरुवात केली आहे. ही मुख्यतः नेरली, कमतनुर, अमनगी निरसोशी, हनी, कनंगला, हरगापूर, अंकले, हातरवाट इत्यादी गावाच्या शेतात केली जाते. दरम्यान, मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने गडिंग्लज मिरची सौद्यास बुधवार व शनिवार रोजी येत असतात जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी मुंबई पुणे कोल्हापूर सांगली संकेश्वर गडहिंग्लजसंकेश्वरीचवळी मिरचीला अधिक मागणी आहे. गरडा मिरची १६० रुपये किलो लवंगी मिरची अडीचशे रुपये किलो बेडगी मिरची दोनशे रुपये किलो साधी संकेश्वरी दोनशे रुपये किलो शंकेश्वर पैसे चारशे रुपये किलो संकेश्वर जवारी चवळी एक हजार रुपये किलो होती.

error: Content is protected !!