राज्य कलाकार महासंघाच्या कागल तालुकाध्यक्षपदी हालगीसम्राट हणमंतराव घुले (सांगावकर) यांची निवड…..

कोल्हापूर /प्रतिनिधी

    महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघाच्या कागल तालुका अध्यक्षपदी क॥ सांगाव (ता.कागल) गावचे सुप्रसिद्ध हालगीसम्राट हणमंतराव घुले (सांगावकर ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
   कागल येथील कागल-मुरगुड रस्त्यावरील डिकेएम भवन येथे पार पडलेल्या नुतन पदाधिकारी निवडीच्या वेळी हालगीसम्राट हणमंतराव घुले यांची निवड झाली. त्यांना निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष जयवंतराव वायदंडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी बोलताना हणमंतराव घुले म्हणाले, राज्य कलाकार संघटनेने माझ्या केलेल्या या निवडीमुळे यापुढे मी कागल तालुक्यातील विविध समजामधील सर्व जेष्ठ व नवख्या कलाकाराना एकञ आणत त्यांच्या अडचणी व समस्यांना जाणुन प्राधान्यक्रम देऊन त्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे.
     यावेळी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सचिन लोहार महिला आघाडी तालुकाध्यक्षा रेखा पांडुरंग घाटगे, युवा हालगीसम्राट कृष्णात घुले, यांच्यासह तालुका व जिल्हा पातळीवरील प्रमुख मान्यवर कलाकार कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!