स्टार अॅकॅडमीच्यावतीने नऊ मान्यवरांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानीत

हेरले / प्रतिनिधी
     स्टार अॅकॅडमीच्या वतीने नऊ मान्यवर कोरोना योध्दयांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. अशी माहिती प्रसिध्दीस अध्यक्ष दीपक शेटे व उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिली.

स्टार अॅकॅडमीच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्काराने माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना सन्मानीत करतांना अध्यक्ष दीपक शेटे व उपाध्यक्ष शिवाजी पाटील…..

     स्टार अॅकॅडमी शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर आहे . गेली सात वर्षे शिक्षण क्षेत्रात विविध स्पर्धांचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असते . तसेच संस्थापकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पर्यंत पुरस्कार देणारी ही महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे .कोणताही प्रस्ताव न घेता गुणवत्तेच्या आधारे हा पुरस्कार सोहळा दरवर्षी अत्यंत दिमाखात संपन्न होत असतो .
      आपला संपूर्ण भारत एकजूटीने कोरोना महामारी विरुद्ध लढत आहे. या बिकट महामारीच्या परिस्थितीत समाजासाठी आपण करत असलेले सेवाभावी कार्य फार महत्वाचे आहे . आपण करत असलेली सेवा मानवतेची एक नवी मशाल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे .आपल्या ह्या ध्येयवेड्या कार्यास स्टार अॅकॅडमी मानाचा मुजरा करत कोरोना योद्धाना सम्मानपत्र प्रदान करून सन्मानित केले आहे.
    स्टार कोरोना योद्धाचे मानकरी कोल्हापूरचे महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी , शिक्षण व अर्थ जि. प . कोल्हापूरचे सभापती प्रवीण यादव, नगर परिषद वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी ,माध्यमिक जि . प . कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार , शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूरचे अध्यक्ष एस डी लाड , जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर साखरे, शिक्षक अरुण मुजुमदार ,डॉ. वर्षा पाटील , शिक्षक युवराज मोहिते आदी स्टार कोरोना योद्ध्यांना स्टार अॅकॅडमी चे अध्यक्ष दीपक शेटे , उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सन्मानपत्र , पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. समाजात या स्टार कोरोना योद्ध्याचे विविध माध्यमातून अभिनंदन होत आहे .

error: Content is protected !!