रुकडीत गणेशोत्सव व मोहरम साजरा होणार साधेपणात

रुकडी /ता :१३ प्रतिनिधी

            कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवून गणेशत्सोव साधेपणात करण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच याच कालावधीत आलेला मोहरम सण देखील साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय रूकडी ( ता.हातकणंगले ) येथील मुस्लीम समाजाच्या वतीने घेण्यात आला.
           रुकडीमध्ये साधारणपणे लहान-मोठी ६५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. प्रत्येक वर्षी गावामध्ये गणेश उत्सवानिमित्त आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापनासह विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात.मात्र या वर्षी कोरोनाचे मोठे संकट पाहता खास . धैर्यशील माने,सरपंच रफिक कलावंत,उपसरपंच राजू कोळी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोलदत्त कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते उत्तम देसाई यांनी सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन चालू वर्षी एकच सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करावी . आणि उत्सव साधेपणाने साजरा करावा . असे आवाहन केले आहे.
              दरम्यान, गणेशत्सोवासह यावर्षी मोहरम सण ही याच वेळी संपन्न होत आहे. रुकडीमध्ये मुस्लिम समाजाबरोबर हिंदू समाजातील लोक ‘पंजांची’ प्रतिष्ठापना करतात. प्रथा व परंपरेनुसार पंजा भेटी, पीर अंगात येणे, खाईतील विस्तवावर चालणे . आणि पंजे विसर्जनावेळी अभिर उधळणे, मिरवणूक असे सार्वजानिक विधी संपन्न केले जातात. या सर्व कार्यक्रमांना खूप गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी मुस्लीम समाजाने आणि सदर उत्सवात सहभागी होणाऱ्या हिंदू समाजानेही हा उत्सव साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय घेतला.त्यामूळे रुकडी गावात प्रथमच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘एक गाव एक गणपती ‘ आणि साधेपणाने ‘मोहरम ‘ या संकल्पना साकार होणार आहेत.बैठकीस मुस्लीम समाजाचे अध्यक्ष लालासो पेंढारी,मकबुल मुल्ला, अस्लम फकीर यांच्यासह हिंदू- मुस्लिम समाजाचे नागरीक उपस्थित होते.

error: Content is protected !!