जयसिंगपूर /प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट पतसंस्थेच्या सभागृहामध्ये वीर सेवा दलाच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात येत असलेल्या महारक्तदान शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न झाली . यावेळी वीर सेवा दलाचे अध्यक्ष राजोबा सर् यांनी सांगितले महाराष्ट- शासन, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 2000 बॉटल रक्त वीर सेवा दल मार्फत रक्तदान शिबिरातून संकलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वीर सेवा दलाच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शाखांमधून 25 डिसेंबर ते 25 जानेवारी या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे निश्चित केल्याचे सांगितले.

कोरोनाच्या काळात महाराष्ट शासन ,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व महाविकास आघाडीच्या सर्व मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व प्रशासनाच्या माध्यमातून निरंतर सेवा चालू ठेवून कोरोनाच्या या संकटावर काही प्रमाणात मात केली आहे. लॉकडाऊन मुळे रक्तदान शिबीरे झाली नाहीत . त्यामुळे आज शासकीय रुग्णालयात वेगवेगळ्या शस्त्रक्रिया व रोगांमध्ये रक्ताची अत्यंत आवश्यकता आहे. वीर सेवा दलाच्या शाखांमधून नेत्र शिबिर, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर यांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असते, वीर सेवादल जे काम हाती घेते ते ताकतीने पूर्ण करते, लोक अथवा सामान्य माणूस अडचणीत असतो . त्या वेळी त्याला मदत करण्यासाठीचे योगदान वीर सेवा दलाने सातत्याने पूर्ण केले आहे, त्यामुळे 2000 बॉटलचे रक्त संकलन वीर सेवा दल संघटना जरुर पूर्ण करेल, असे मत आरोग्य राज्यमंत्री मा.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी वीर सेवा दलाचे कार्याध्यक्ष भूपाल गिरमल, दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन भालचंद्र पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष दक्षिण भारत जैन सभा व उपाध्यक्ष अरविंद मजलेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सेक्रेटरी एन.जे. पाटील, जॉईट सेक्रेटरी डॉ. रावसो कुन्नुरे, मुख्य संघटक सुभाष मगदूम, उपाध्यक्ष दक्षिण भारत जैन सभेचे अरविंद मजलेकर, राजू झेले, दादा पाटील चिंचवाडकर, सिध्दी विनायक ब्लॅड बँक मिरजचे जितेंद्र पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत संघटक, सुभाष मगदूम व प्रास्ताविक कार्यवाह एन.जे.पाटील यांनी केले तर अजित भंडे यांनी आभार मानले. यावेळी वीर सेवा दल व संलग्न संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.