शिरोली/वार्ताहर
सावर्डे(ता.हातकणंगले) येथील श्री गुरुदत्त सहकारी दूध व्यवसायिक संस्थेस जिल्हा विकास अधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पदुम कोल्हापूर यांचेकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. गुरुदत्त दूध संस्थेचे मुख्य प्रवर्तक रावसाहेब उर्फ दिपक शिवाजी चव्हाण यांनी काही महिन्यापूर्वी या संस्थेचे संकलन सुरू केले आहे. सध्या या संस्थेचे प्रतिदिनी गाय व म्हैस अकराशे लिटर इतका दूध पुरवठा कोल्हापूर जिल्हा गोकूळ दूध संघास होत आहे .

चव्हाण यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना संघाकडून मिळणाऱ्या सर्व सेवा- सुविधांचा चांगल्या पद्धतीने वापर सुरू केला आहे . यामुळे उत्पादक आणि संस्थाचालक यांचे घट्ट नाते निर्माण झाले. येत्या काही महिन्यांमध्ये दोन हजार लिटर प्रतिदिनी दूध संकलन करण्याचा मानस चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला . तसेच या संस्थेचे सध्याचे दूध पाहता अत्यंत चांगले व समाधान कारक बाब असल्याचे मत सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले .
हे प्रमाणपत्र स्विकारताना सहाय्यक निबंधक कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी श्री दवडते , संघाचे सिनियर सुपरवायझर सुरेश पाटील , जोतिराम कदम, दशरथ भोसले,आनंदराव पाटील ,अशोक चव्हाण व संचालक मंडळ उपस्थित होते.