विश्र्वविक्रमवीर केदार साळुंखे यांना सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारने सन्मानीत

हेरले / प्रतिनिधी
     मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद, भारत यांचेवतीने देण्यात येणारा “सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० ” विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डॉ . केदार विजय साळूंखे यास माजी खासदार राजू शेट्टी ,भारत कुस्ती संघाचे सभापती डी.आर जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांचे उपस्थितीत देवुन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम इचलकरंजीमध्ये संपन्न झाला .

    भारत कुस्ती संघाचे सभापती डी आर जाधव यांचेकडून डॉ.केदार साळुंखेस पुरस्काराने सन्मानित करतांना.

    विश्र्व विक्रमवीर डाॅ.केदार साळुंखे हा अवघ्या सातव्या वर्षी सायकलिंगमध्ये एकाच बुकमध्ये एकाच वेळी चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत स्केटींग व सायकलिंग मध्ये १४ विश्वविक्रम नोंदवले आहेत. डाॅ केदार यास वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरेट इन ॲथलेटीक्स ही पदवी देऊन ‘द दायसेस ऑफ अशिया चेन्नई तामिळनाडू ‘ या संस्थेकडून सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्याने कित्येक स्पर्धेत विजेतेपद पटकावली आहेत. यामध्ये गाेल्ड वीस , सिल्वर सोळा , ब्राँझ पंधरा पदकासह अन्य बक्षिसेही मिळविली आहेत .
    मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद, भारत यांचेवतिने देण्यात येणारा”सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० ” क्षेत्रातील नवीन उंची गाठण्यासाठी केलेली कठोर परिश्रम, समर्पण आणि आवेश ओळखण्यासाठी व भवितव्य घडविण्यासाठी उपयाेगी पडणार आहे. डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुलच्या प्राचार्या स्नेहल नावेॅकर, प्रशिक्षक सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल विजय साळूंखे व आई स्वाती गायकवाड -साळूंखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!