अरुण भोसले यांचे कुंभोज नगरीमध्ये जंगी स्वागत; सवाद्य रथातून मिरवणूक व भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

कुंभोज :आकाश शिंदे
    कुंभोज येथील अरुण वसंत भोसले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धेत पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI) निवड झाली आहे. अरुण भोसले यांची फेब्रुवारी २०१२ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे नियुक्ती झाली होती. अरुण भोसले यांना एमपीएससी भरतीसाठी मार्गदर्शक म्हणून अण्णासाहेब डांगे कॉलेज , हातकणंगलेचे शिक्षक अमर कांबळे , कोरोचीचा पीएसआय मित्र गणेश माने , उचगावचे मामा प्रशांत जाखले , कुंभोज विकास सेवा सोसायटीचे संचालक जालिंदर कोळी , पुण्याच्या बालेवाडी विद्या प्रबोधिनीचे कोच दादासाहेब भोरे , पुणे येथील एपीआय विनोद साने , हातकणंगले येथील मित्र एसटीआय विशाल हापटे , वडील वसंत भोसले , आई रुक्मिणी भोसले , भाऊ अशोक भोसले व पत्नी सुजाता भोसले या सर्वांचे मार्गदर्शन लाभले .

    पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातल्यानंतर अरुण भोसले यांचे कुंभोज नगरीमध्ये प्रथमच आगमन झाले होते त्याअनुषंगाने समस्त कुंभोज ग्रामस्थ विविध संस्था विविध तरुण मंडळे तसेच समस्त वाडी भाग यांच्या वतीने कुंभोज बस स्थानक परिसर ते वाडी भाग कुंभोज अरुण यांच्या निवासस्थाना पर्यंत सवाद्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, कर्मवीर संचालक किरण माळी,जवाहर चे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले, सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दावीद घाटगे, माजी सरपंच प्रकाश पाटील, संदीप कारंडे,सराफ असोसिएशनचे विनायक पोतदार,सर्व नुतन ग्रामपंचायत सदस्य, रविराज जाधव, कलगोंडा पाटील, वडिल वसंत भोसले, भाऊ अशोक भोसले, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रमुख आघाडीचे गटनेते, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!