कोल्हापूर /प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते होणार पदवीदान
संजय घोडावत विद्यापीठाचा दुसरा पदवीदान समारंभ (Convocation) शनिवार दि.२३ जानेवारी रोजी दु.२.१५ वा. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने संजय घोडावत विद्यापीठात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के हे लाभलेले आहेत. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी घोडावत हे भूषविणार आहेत. कोरोना संसर्गामुळे सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करून हा पदवीदान संभारंभ ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार असून ज्या विद्यार्थ्यांनी विभागनिहाय प्रथम क्रमांकाने सुवर्णपदक पटकाविले आहे अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने पदवीप्रदान केली जाणार आहे. तसेच या कार्यक्रमास त्यांचे पालक देखील उपस्थित राहणार आहेत. बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवीप्रदान केली जाणार आहे. यामध्ये स्कुल ऑफ लिबरल आर्टस्, स्कुल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, स्कुल ऑफ सायन्स व स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अशी माहिती संजय घोडावत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.एम.टी.तेलसंग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे या सद्भावनेतून उद्योगपती संजयजी घोडावत यांनी २००९ साली संजय घोडावत इन्स्टिटयूट ची स्थापना केली यानंतर एमबीए, इंटरनॅशनल स्कुल,पाॅलिटेक्निक, आय आय टी व मेडिकल अकॅडमी, ज्यु.कॉलेज, ऑलिम्पियाड स्कुल यामाध्यमातून त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. २००९ साली लावलेल्या शिक्षणरुपी रोपट्याचे २०१७ मध्ये संजय घोडावत विद्यापीठाच्या रूपाने विशाल वटवृक्षात रूपांतर झाले. आज संस्थेमध्ये १५००० हून अधिक विद्यार्थी उत्तम दर्जाचे शिक्षण घेत आहेत. केजी टू पीएचडी पर्यंतचे शिक्षण देणारे महाराष्ट्रातील एक नामवंत संकुल म्हणून घोडावत शिक्षण संकुलाकडे पाहिले जाते.आजवरच्या शैक्षणिक वाटचालीत संस्थेला मिळालेला नॅक चा अ दर्जा, एनबीए मानांकन, आएसओ ९००१ -२००८ मानांकन, गतवर्षी संजय घोडावत विद्यापीठास आयएसओ ९००१:२०१५ आणि आयएसओ २१००१:२०१८ मानांकन देखील प्राप्त झाले असून अशा प्रकारचे दुहेरी मानांकन मिळविणारे संजय घोडावत विद्यापीठ हे भारतातील पहिलेच विद्यापीठ आहे.
या विद्यापीठामार्फत प्रामुख्याने अभियांत्रिकी,आर्किटेक्चर, व्यवस्थापन, कला, विज्ञान, वाणिज्य, औषध विज्ञान (फार्मास्युटिकल सायन्सेस),या विभागांतर्गत अभ्यासक्रम सुरु करण्यात आले असून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी पर्यंत पदवी संपादन करण्याची संधी उपलब्ध आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी विश्वस्त विनायक भोसले, प्रभारी कुलगुरू डॉ.एम.टी.तेलसंग, कुलसचिव डॉ.एन.के.पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी,परीक्षा नियंत्रक डॉ.श्रीनिवास बाळकुंडी, सहाय्यक रजिस्ट्रार प्रा.अरविंद कांबळे व प्रा.प्रीतम निकम व टीम ने अथक परिश्रम घेतले आहेत.
या कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले व सचिव श्री श्रेणिक घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.