लिंगायत समाजाच्या सभागृहाला निधी कमी पडू दिला जाणार नाही -संजय पाटील-यड्रावकर

शिरोळ / प्रतिनिधी
     महादेव मंदिर जीर्णोद्धार व लिंगायत समाजाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाला निधी कमी पडू दिला जाणार नाही . असे सांगताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावतीने ग्वाही देत आहे असे उद्गगार जयसिंगपूर चे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी काढले.

     जुने दानवाड ( ता. शिरोळ ) येथील लिंगायत समाज व बसवेश्वर तरुण मंडळाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सामाजिक सभागृह व महादेव मंदिर जीर्णोद्धाराच्या पायाभरणी शुभारंभप्रसंगी ते बोलत होते,सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नातून शासनाच्या पंचवीस पंधरा योजनेमधून या कामाला मंजुरी मिळाली असून या कामासाठी २३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे, याच बरोबर गावातील गुरव पाणंद रस्त्यासाठी राज्यमंत्री यड्रावकर यांनी आठ लाखाचा निधी मंजूर केला आहे.
     महादेव मंदिर जीर्णोद्धार व सामाजिक सभागृहाचा पायाभरणी समारंभ संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
     यावेळी कलगोंडा पाटील- शिरढोणे, आदगोंडा पाटील, बापुसो मलिकवाडे, माजी सरपंच आप्पासो वडगावे, चवगोंडा पाटील, भरमु गुरव, जे. आर. पाटील, बाबगोंडा पाटील, रावसाहेब कुंभोजे, अमोल सिदनाळे, रवींद्र पाटील, शिवराज तासगावे, प्रकाश पाटील, अरुण पाटील, रविंद्र गुरव, अभिजीत मलिकवाडे, गांधी पाटील, कुमार तिप्पनावर, प्रशांत पाटील, राजू पाटील, गजेंद्र राजपूत, बाबगोंडा पाटील सर, जयसिंगपूरचे नगरसेवक संभाजी मोरे, कुरुंदवाडचे नगरसेवक जवाहर पाटील यांच्यासह गावातील नागरिक युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..

error: Content is protected !!