गाजर दाखविणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखविण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनाचा वणवा पेटविणार ; संदीप कारंडे यांचा इशारा

हातकणंगले / प्रतिनिधी :
        केंद्र शासनाने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी. अन्यथा आरक्षणाचे गाजर दाखविणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखविण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनाचा वणवा पेटविणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण समन्वय समितीचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी हातकणंगले येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला . तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमीत राज्य गोलमेज परिषद घेवून पश्चिम महाराष्ट्रात समाजप्रबोधन करणार असल्याचा इशारा धनगर आरक्षण समन्वय समितीचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी दिली . ते धनगर आरक्षण समन्वय समीतीच्या वतीने हातकणंगले येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

     धनगर समाजाला केंद्रात ओबीसी , महाराष्ट्रात एनटी प्रवर्गात समावेश आहे .परंतु धनगर समाजाचा घटनेत एस.टी प्रवर्गात समावेश असतानाही ‘ड ‘ व ‘ र’ वाद निर्माण करून शासनाने समाजाला झुलवत ठेवले आहे. २०१४च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथील धनगर आरक्षण आंदोलनाला सामोरे जाताना त्यांनी भाजपा सत्तेत आल्यास पहिल्याच बैठकीत हा प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन दिले होते . मात्र आरक्षण न देता टिस संस्थेच्या माध्यमातून सव्हें करण्याचे नाटक केले , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही आश्वासन देऊन दुर्लक्ष केले आहे , त्यामुळे धनगर समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे

     सध्या आरक्षणाची न्यायालयीन लढाई सुरु आहे . यामध्ये केंद्र व राज्य सरकारची भूमिका महत्वाची राहणार आहे , त्यामुळे    सरकारने योग्य भूमिका घ्यावी , तसेच सर्व राजकीय पक्ष व लोकप्रतिनीधींनी तातडीची बैठक घेवुन आरक्षणाच्या मुद्दयावर स्वतंत्र्य अधिवेशन बोलवावे . आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा . तसेच राज्य सरकारने ज्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी तत्परता दाखविली तशीच तत्परता धनगर आरक्षणालाही दाखवावी , यावेळी मराठा आरक्षणाला ही त्यांनी पाठींबा असल्याचे सांगितले . तसेच यावेळी मराठा समाजाने मोठा भाऊ म्हणून लहान भावाला म्हणजेच धनगर जमातीला या लढाईत सहकार्य करावे असेही ते म्हणाले .
      या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी व आरक्षण अंमलबजावणीसाठी समाज जाच्यावतीने प्रचंड मोठे आंदोलन केले जाणार असून आंदोलनाची सुरूवात राजर्षी शाहू महाराज यांच्या कर्मभूमीतून करणार असून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची गोलमेज परिषद आयोजित करुन आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . पत्रकार परिषदेला दत्ता ठोंबरे , विशाल काळे , हरिशचंद्र कोकाटे , अमोल गावडे , बिरदेव कुशाप्पा , मोहन कोळेकर , सुशांत मोटे , शरद पुजारी ,बंडा शिंगाटे उपस्थित होते .

     आत्ता पर्यंत सत्तेत येणार्‍या प्रत्येक राजकीय पक्षाने आमच्या जमातीला गृहित धरण्याचे काम केले आहे . मात्र पुढील काळात आरक्षणाचे गाजर दाखविणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखविण्यात येईल . असा इशारा सुद्धा संदीप कारंडे यांनी दिला . आमच्या न्यायहक्कासाठी लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखो बकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले .

error: Content is protected !!