तब्बल बारा हजार लोकांचा सर्वे पूर्ण ; ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेची वाटचाल प्रगतीपथावर

शिरोली(पुलाची)/ता. २१ प्रतिनिधी

      शिरोली (ता. हातकणंगले) येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेमध्ये बारा हजार लोकांचा सर्वे पूर्ण झाला आहे. सर्वे मोहीम पाच दिवस करण्यात आली . मोहिमेत शासकीय अधिकारी , कर्मचारी यांच्यासह नागरिकांचा उस्फुर्त सहभाग होता .

      शिरोली गावातील सर्व लोकांचा सर्वे केला जाणार आहे. सुमारे अडीच ते तीन हजार लोकांचा सर्वे दररोज होत आहे. ६३०४ घरांतील लोकांचा सर्वे केला जाणार असुन याकरिता तलाठी निलेश चौगुले, ग्रामविकास अधिकारी ए.एस.कठारे व कृषी अधिकारी प्रमोद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कामकाज सुरु आहे . बारा पथके तयार करण्यात आली असुन प्रभागवार सर्वे सुरू आहे . कोतवाल संदीप पुजारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा समावेश आहे.

    पथक प्रत्येक घरात जावून कुटूंबातील लोकांची उपलब्ध साधनांच्या आधारे प्राथमिक तपासणी करून नोंदी घेत आहेत. सर्व माहिती शासनाच्या संगणक प्रतिनिधीमार्फत विशेष पोर्टलवर पाठविण्याचे काम ग्रामविकास अधिकारी तात्काळ करीत आहेत.
     शासकीय अधिकारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरोघरी जावून सर्वेचे काम करत आहेत. तसेच जेवणाच्या वेळेत नागरीकांची गैरसोय होवू नये म्हणून आपले कर्तव्यही पार पाडत आहेत. याबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
मोहिमेचा शुभारंभ सरपंच शशिकांत खवरे ,स.पो.नि. किरण भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ.जेसिका अॅंन्ड्रूस, उपसरपंच सुरेश यादव , तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, ग्रा.पं. सदस्य प्रकाश कौंदाडे, बाबासाहेब कांबळे, संग्राम कदम, विनायक कुंभार व सदस्य आदींच्या उपस्थितीत करण्यात आला .

error: Content is protected !!