२१ सप्टेंबर दिनविशेष

१९३४: ’प्रभात’च्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून ’प्रभात चित्रमंदिर’ या नावाने सुरू केले. ’प्रभात’चाच ’अमृतमंथन’ हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता.

१८६६: विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचा जन्म.

१८८२: भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म.

१९२९: शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म.

१९३९: भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी अग्निवेश यांचा जन्म.

१९४४: चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली यांचा जन्म.

१९८०: अभिनेत्री करीना कपूर यांचा जन्म.

१९८१: अभिनेत्री रिमी सेन यांचा जन्म.

१७४३: जयपूर संस्थानचा राजा सवाई जयसिंग यांचे निधन.

१७९७: औध चे नवाब शुजा-उद-दौला यांचा मुलगा आसफ-उद-दौला यांचे निधन.

१९८२: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन.

१९९२: चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स] ताराचंद बडजात्या यांचे निधन.

२०१२: पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक गोपालन कस्तुरी यांचे निधन.

error: Content is protected !!