हातकणंगले /प्रतिनिधी
बहुचर्चीत सांगली कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरण दरम्यान शिरोली ते सांगली फाटा हा रस्ता जवळपास 70 टक्के पूर्ण झाला आहे .मात्र अतिग्रे येथील रस्ता अद्याप अपूर्णावस्थेत आहे .रस्त्यावर दुतर्फा लाल माती असल्यामुळेपावसाळ्यात चिखल होऊन अपघाताला सामोरे जावे लागत आहे . अनेक निवेदन देऊनही अतिग्रे येथील रस्ता दुरुस्त होत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी ( २३ ) रोजी सांगली कोल्हापूर रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन सरपंच सागर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले
यावेळी संदीप सूर्यवंशी ,वसंत पाटील, प्रकाश गोंधळी, राहुल सूर्यवंशी, पुंडलिक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सागर पाटील
शिरोली ते अंकली फाटा महामार्गावरील अपुऱ्या कामामुळे अतिग्रे गावच्या हद्दीत वारंवार होणारे अपघात व सततची होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन रस्त्याची डागडूजी करावी.