इंगळी / प्रतिनिधी

इंगळी (ता. हातकणंगले ) येथील चर्मकार समाज उन्नती मंडळ नवीन वसाहतीमधील यांच्यावतीने संत रोहिदास महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात पार पडली. यानिमित्य शिवमहोत्सव परिवार संचलित जीवनदान ब्लड डोनेशन चॅरिटेबल ट्रस्ट हुपरी व डॉ. प्रशांत निर्मळे यांच्या मार्गदर्शनखाली भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी हातकणंगले तालुक्याचे भाजप -जनसुराज्यचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने उपस्थित होते .

या कार्यक्रमासाठी इंगळी ग्रामपंचायत सदस्य युवराज चव्हाण, न्यायनिवाडा फौंडेशन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रशांत निर्मळे, चर्मकार महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख कुबेर निर्मळे, समाजाचे अध्यक्ष महेश चव्हाण, उपाध्यक्ष राजू चव्हाण, खजिनदार निखिल चव्हाण, सेक्रेटरी लहू यादव, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम चव्हाण, इंगळी शाखा अध्यक्ष बंडू चौधरी, राजू आडके, तोडकर सर, डॉ. विशाल सर, व सर्व समाज बांधव उपस्थित होते या शिबिरामध्ये 104 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.यावेळी नवीन नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला .
