नवनवीन योजनांचा खातेदारांनी लाभ घ्यावा-प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर

वारणानगर/ता. 22
  बँक ऑफ महाराष्ट्र च्या वतीने आयोजित विविध ग्राहक उपयोगी योजनांचा पगारदार खातेदारांनी ही लाभ घ्यावा असे आवाहन कोडोली येथील बँकेचे शाखाधिकारी श्री विकी विटोरे यांनी येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये आयोजित प्राध्यापक प्रबोधनी अंतर्गत व्याख्यानमालेत बोलताना केले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आयोजित व्याख्यानमालेत बोलताना बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी विकी विटोरे, सोबत प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर.

  ते पुढे म्हणाले की, “बँकेकडे असणाऱ्या पगारदार खातेदारांसाठी ४० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्याच बरोबर
  तीन लाखापर्यंत क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेने नुकतीच फास्टेग ची सुविधाही ग्राहकांच्यासाठी सुरू केले असून त्याचा लाभ घ्यावा.
  गृहबांधणी, वाहन खरेदी, कृषी कर्ज सारख्या अन्य सुविधांसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधून लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. बँक ऑफ महाराष्ट्र ही एक नामांकित व राष्ट्रीय कृत बँक आहे. रिझर्व बँकेच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन होत असून ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
  अध्यक्षीय समारोपात डॉ. चिकुर्डेकर म्हणाले की,” पगारदार खातेदारांना ४० लाख रुपयांचे विमा संरक्षण देऊन बँकेने आपली बांधिलकी जपली आहे. नवनवीन योजनांचा खातेदारांनी लाभ घ्यावा.”
  स्वागत प्रास्ताविक डॉ. सी. आर. जाधव यांनी केले. नॅक समन्वयक डॉ. एस.एस. खोत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!