आळते / वार्ताहर

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित जयवंत माध्यमिक विद्यालय ,मजले येथील विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा( आठवी) फेब्रुवारी 2020 मध्ये यश संपादन केले. यामध्ये प्रेरणा अमोल पाटील (जिल्हा गुणवत्ता यादीत 36वी) आणि वृषाली विनोद कोठावळे (जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत 44 वी ) या दोन्ही विद्यार्थिनीनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले. तसेच विद्यालयाचे एकूण तेरा विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले. सदर विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने कार्याध्यक्ष विकासराव माने जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक जितेंद्र म्हैशाळे व सहायक शिक्षक श्रीकांत पाटोळे, राजेंद्र शेटे, रमेश वसगडे ,अविनाश खेंगट यांचे मार्गदर्शन लाभले.
