नितिन पाटील यांच्या नावासमोर एक पसंती क्रमांक लिहुन भरघोस मतांनी विजयी करा – प्रा. श्रीधर वैद्य

कोल्हापुर / प्रतिनिधी
   शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व शैक्षणिक व्यवस्येच्या प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपुर्ण आवाज उठवणारा शिक्षकांमधील उमेदवार असावा. याच उद्देशाने टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्स ( टॅफनॅप ) व इतर समविचारी संघटनांच्या वतीने नितीन भाऊराव पाटील यांना विधान परिषद पुणे विभागातील शिक्षक मतदार संघातुन उमेदवारी दिली आहे. तसेच त्यांच्याकडे शिक्षकांचा उमेदवार म्हणुन पाहिले जाते. तरी मत पत्रिकेतील अनुक्रंमाक पंधरा नंबरच्या नितिन भाऊराव पाटील यांच्या नावासमोर एक पसंती क्रंमाक लिहुन भरघोस मतांनी निवडुन देणेचे आवाहन संघटनेचे सचिव प्रा. श्रीधर वैद्य यांनी केले आहे.

     उमेदवार प्रा. नितीन पाटील

       प्रा.वैद्य यांनी पुढे सांगितले की ,उमेदवार नितिन पाटील हे श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस संचलित न्यु पॉलिटेक्नीक , उचगांव , कोल्हापुर येथे प्राध्यापक म्हणुन काम करीत असुन त्यांनी राज्यातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थामधील हजारो कर्मचाऱ्यांची होत असलेली आर्थिक पिळवणुक बंद केली आहे. विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थामधील कर्मचाऱ्यांचे सेवानिश्चितेचे प्रश्न , बंद पडणाऱ्या संस्थामधील कर्मचाऱ्यांचे समायोजन , थकीत वेतनाच्या प्रश्नाबाबत अनेक आंदोलनाच्या माध्यमातुन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा तसेच व्यवसायिक संस्थामधील अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभुत पद्धतीने प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. सामाजिक न्याय खात्याकडुन देय रक्कमेची प्रतीपुर्ती वेळेत होणेसाठी पाठपुराव्यासह शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर कायमस्वरूपी आंदोलनाच्या माध्यमातुन न्याय मिळवुन देणेसाठी प्रयत्नशील असतात. तरी आपल्या अन्य समस्या सोडविण्यासाठी निष्कलंक उमेदवार नितीन पाटील यांच्या नावासमोर एक नंबर पसंती क्रंमाक लिहुन विजयी करण्याचे आवाहन प्रा. वैद्य यांनी केले आहे .

error: Content is protected !!