शिक्षकांनी २६ नोव्हेंबरच्या संपात सहभागी व्हावे….प्राथमिक शिक्षक समितीचे आवाहन

 कोल्हापुर / वार्ताहर

      केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी,कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ दि २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी संपात सर्व प्राथमिक शिक्षकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील,जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौदकर यांनी केले आहे,अशी माहिती पुणे विभाग राज्य प्रसिद्धिप्रमुख हरिदास वर्णे यांनी कळविले आहे.

       केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी,कर्मचारी विरोधी धोरणे अंमलात आणण्याचा सपाटा लावला आहे.त्यामुळे श्रमिक जगतावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.सर्वच संवर्गातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी,खासगीकरणाला आळा घालून कंत्राटीकरण रद्द करावे,अंशकालीन,बदली व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे,मुदतपूर्व सेवा निवृत्तांचे अन्यायकारक धोरण रद्द करावे,अन्यायी सुधारित कामगार कायदे रद्द करावेत,राज्य सरकारी कर्मचार्यांना केंद्र सरकारप्रमाणे सर्व भत्ते मंजूर करून महागाई भत्ता व सातव्या आयोगातील थकबाकी विना विलंब द्यावी,सर्व रिक्त पदे भरावीत,जिल्हा परिषद कर्मचारी,शिक्षक- शिक्षकेतर यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत,या अन्य मागण्यांसाठी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे.
     जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील,जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौदकर,शिक्षक नेते कृष्णात कारंडे,बाळासाहेब पोवार,बळवंत शिंत्रे,रवळू पाटील,सतीश बरगे, हरिदास वर्णे,राजीव परीट,विष्णू जाधव,बाजीराव पाटील,बाबा खोत,संजय कुंभार,मारुती पाटील,अशोक साबळे,गोविंद पाटील,पी के पाटील,जीवन कांबळे,सुनील शिंदे,चंद्रकांत पाटील,दिलीप पाटील,बाबा धुमाळ,शाहू चौगले,प्रभाकर कमळकर,आर के पाटील,विजय पाटील,एम एन शिंदे,संतोष पाटील,सुकुमार मानकर,एकनाथ गिलबिले,अनिल गायकवाड,ढवण सर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!