विश्वविक्रमवीर डाॅ. केदार साळूंखे , स्केटींग प्रशिक्षक सचिन इंगवले यांना युवा स्टेट अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित

हेरले / प्रतिनिधी
    आठ वर्षीय विश्वविक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट डाॅ. केदार विजय साळूंखे यास बहुजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने देण्यात येणारा युवा स्टेट अवॉर्ड 2020 या पुरस्काराने प्रसाद संकपाळ, प्रा. गिरी, निरंजन तिवारी, महेश शिर्के अनिल माळवी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. तसेच सचिन टीम टाॅपर्सचे स्केटींग प्रशिक्षक सचिन इंगवले यांना युवा स्टेट अवॉर्ड 2020 क्रिडा प्रशिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       डॉ.केदार साळुंखे युवा स्टेट अॅवार्ड स्विकारतांना

      विश्व विक्रमवीर डाॅ.केदार साळुंखे यांने अवघ्या सातव्या वर्षी सायकलिंगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत स्केटींग व सायकलिंग मध्ये १२ विश्वविक्रम नोंदवले आहेत. तसेच अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याने अनेक स्पर्धेत विजेतेपद पटकावली आहेत. यामध्ये गाेल्ड मेडल वीस, सिल्वर सोळा , ब्राँझ पंधरा पदक व अन्य बक्षिसेही मिळवली आहेत.
     डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुलच्या प्राचार्या स्नेहल नार्वेकर, शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मेघराज खराडे ,शिवतेज खराडे , संजीवन स्कुलचे चेअरमन अमर सरनाईक , प्रशिक्षक सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडील पीआय विजय साळूंखे आई डीवायएसपी स्वाती गायकवाड -साळूंखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे .

error: Content is protected !!