शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणाऱ्या शेती औजारे व यंत्राचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू

हातकणंगले / प्रतिनिधी
      कृषी उन्नती योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उप अभियानमधुन शेतकऱ्यांना कृषी औजारे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून इच्छुक शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in
या संकेत स्थळावर फॉर्म भरावा. असे परिपत्रक निविष्ठा व गुणनियंत्रण कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी काढले आहे. तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
      केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कृषी औजारांचा समावेश आहे . त्याच यंत्राचा व औजारांसाठी अनुदान मिळणार आहे . यामध्ये अनुसूचित जाती , जमाती , अल्प, अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांसाठी औजारांच्या किंमतीच्या 50% किंवा सव्वालाख यापैकी कमी असेल इतके अनुदान मिळणार आहे. तर अन्य शेतकऱ्यांसाठी 40 टक्के किंवा एक लाख यापैकी कमी असेल याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. तसेच इतर औजारांसाठी केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार घोषित केल्या प्रमाणे अनुदानास मर्यादा राहणार आहे. ट्रॅक्टर , पॉवर टिलर व यादीमध्ये समाविष्ट असलेली औजारे खरेदी करताना केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी केलेल्या संस्थेकडून खरेदी करावयाची असून त्याची तपासणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडून होणार आहे.

error: Content is protected !!