जवानवीर रामदास निपाणीकर यांच्यावरती हातकणंगले येथे अंत्यसंस्कार

हातकणंगले / प्रतिनिधी

     “वीर जवान अमर रहे ” च्या जयघोषात, फुलानी सजवलेल्या वाहनातून हातकणंगले नगरीचे जावई तसेच फर्स्ट रॅफ बॉर्डर फॉर्स वायरलेस फोर्स डिपार्टमेंटचे जवानवीर रामदास बलराम निपाणीकर यांच्यावरती शासकीय इतमामात हातकणंगले येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .

      निपाणीकर हे मूळचे गोव्याचे असून ते हातकणंगले येथील जावई आहेत . त्यांचे पार्थिव देह हातकणंगले येथे आणण्यात आला. शासकीय व लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झीरो 4 बटालियन यांनी रायफलच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक या बटालीयन अंत्यविधीला उपस्थित होते. रोहन, आणि रोहीत या दोन मुलानी मुखाग्नी दिला. हातकणंगले येथील व्यापारी बंधूंनी दुपारनंतर आपले संपूर्ण व्यवहार बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहिली.

     अतिरिक्त पोलीस अधीक्षक डाॅ जयश्री गायकवाड, आमदार राजू बाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हापरिषद सदस्य अरुणराव इंगवले, प्रसाद खोबरे, नगरपंचायतचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, उपनगराध्यक्ष रणजीत धनगर तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी वीर जवानास आदराजंली वाहली

error: Content is protected !!