एस.टी. बसची इनोव्हाला जोरदार धडक ; जागीच तीन ठार , चार जखमी , चालक-वाहकाने काढला पळ …

कोल्हापूर / प्रतिनिधी

     डंपरला ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या इनोव्हाला एसटी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर अन्य चार जण जखमी झाले. आक्काताई दिनकर माळवे (वय वर्षे-65) , करण दीपक माळवे (वय वर्ष -२७ ) , संजय दिनकर माळवे (वय वर्ष- ३५ , सर्व रा. कळे ता. करवीर जि. कोल्हापूर सध्या रा. विक्रमनगर कोल्हापूर ) अशी मृतांची नावे आहेत . हा अपघात आज सकाळी अकराच्या दरम्यान कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कळंबे तर्फ कळे (ता. करवीर ) गावच्या हद्दीतील शिव्याची पाणंद रस्ता येथे घडला. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील सौ. सरिता उत्तम पाटील यांनी पोलिसात दिली आहे .
      याबाबत पोलिसांतून मिळालेली आधिक माहिती अशी की , कणकवली डेपोची एसटी बस क्रमांक MH-13 /CU-8734 ही गगनबावडा कडून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने निघाली होती. एसटी. बस कळंबे तर्फे कळे (ता. करवीर ) गावच्या हद्दीत शिव्याची पानंद रस्त्याजवळ आली. एसटीच्या समोरून एक डंपर निघाला होता. एसटी बसचालकाने डंपरला ओव्हर करत असताना समोरून येत असलेल्या इनोव्हा क्रमांक MH-09/ BW-4441 ला जोरदार धडक दिली. यावेळी काय झाले लवकर कोणाला समजलेच नाही. एसटीची जोरदार धडक बसल्याने इनोव्हाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर तात्काळ नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. मयत व जखमी झालेले सर्वजण इनोव्हामध्ये अडकले होते . ते एकाच कुटुंबातील आहेत. अपघातात आक्काताई दिनकर माळवे , करण दीपक माळवे व संजय दिनकर माळवे हे तिघे जागीच ठार झाले तर अन्य समर्थ संजय माळवे ( वय वर्ष -१६ ) , नंदा दीपक माळवे (वय वर्षे-40) , पूजा संजय माळवे (वय वर्षे-36 ) सुनिता भगवान चौगुले (वय वर्षे-५०)वय पन्नास अशी गंभीर जखमींची नावे आहेत. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना 108 नंबरच्या ॲम्बुलन्सने कोल्हापूर येथील सीपीआर येथे पाठविण्यात आले . तर मृतांची प्रेते बाहेर काढण्यात आली. अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाणेत झाली आहे.

       एस.टी. बस चालक -वाहक फरार

   एसटी बसने इनोव्हाला जोरदार धडक दिल्यानंतर एसटीचे चालक वाहक अपघातग्रस्तांना मदत करत असतील असे नागरिकांना वाटले. पण नागरिकांनी त्या दोघांचा शोध घेतला असता दोघेही फरार होवुन गायब झाल्याचे समजल्यानंतर नागरिकांतून संताप व्यक्त होत होता . 

error: Content is protected !!