भुदरगड पोलीस ठाण्यात सावकारीतून दोघांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

गारगोटी ता..२४ ( प्रतिनिधी)
     व्याजाने घेतलेले पैसे दिले नाहीत,त्यातून झालेल्या वादातून भुदरगड तालुक्यातील दोघांवर अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद झाला आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सचिन कृष्णा कांबळे वय ४१ (रा.गडबीद्री ता भुदरगड ) याने एप्रिल २०१८ मध्ये सुनिल शामराव कल्याणकर (रा. पुष्पनगर ता भुदरगड ) यांचेकडून ५० हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते, त्यापोटी फिर्यादी कांबळे यांनी कल्याणकर यांना वेळोवेळी ९० हजार रुपये दिले होते, तरीही दरदिवशी व्याज धरून १६ लाख रुपये द्यावे . असा तगादा कल्याणकर यांनी लावला,व दि.१९ डिसेंबर २०३० रोजी खानापूर ता भुदरगड येथील हिरकणी हॉटेल येथून मोटारसायकलवरून फिर्यादिस घेऊन जाऊन पुष्पनगर येथील जनावरांचे गोठ्यात बांधले व जातीवाचक शिवीगाळ केली व राणेवाडी (ता. भुदरगड ) येथे सोडले. याबाबत भुदरगड पोलिसात सुनिल शामराव कल्याणकर व पंकज (पूर्ण नाव माहीत नाही) अशा दोघांवर भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे, याबाबत उलट सुलट चर्चा चालू असून अधिक तपास पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ करीत आहेत.

error: Content is protected !!