कोल्हापूर / प्रतिनिधी

जिल्ह्यात सुरू असलेल्या ४३३ ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा ग्रामीणची बैठक पार पडली . यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा ग्रामीणच्या पदाधिकऱ्यांना मार्गदर्शन केले, पंचायतराज व्यवस्थेतील महत्त्वाची आणि प्राथमिक सत्ता आपल्याकडे आली . तरच पक्षाच्या वाढीला ती पूरक ठरेल व कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपला बळकटी मिळेल. तेव्हा खूप मेहनतीने आपण ही ग्रामपंचायत निवडणूक लढवू आणि जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला .

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार श्री. भरमुअण्णा पाटील, माजी आमदार श्री. अमल महाडिक, श्री. अरुण इंगवले, श्री. हिंदुराव शेळके आदि मान्यवरांसह कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
