
सध्या किरकोळ ताप खोकला आला तरी अनेकजण भयभीत होत आहेत . स्वॅब टेस्ट घेतल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्टने संपूर्ण घरच हादरून जात आहे . यानंतर उपचारासाठी करावी लागणारी लाखाच्या घरातील आर्थिक जुगाड अनेकांना कर्जबाजारी करीत आहे . पण त्याला एकमेव आधार व वरदान ठरले आहे . हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील घोडावत युनिव्हर्सिटी येथील शासनाचे मोफत कोवीड सेंटर . येथे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे . कोवीड सेंटरचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडून होत असलेली योग्य व अचूक तपासणी , उपचार पद्धत तसेच रुग्णांना मिळत असलेली आपुलकीची सेवा अन् वागणूक यामुळे जवळपास सात हजार रुग्णांना जीवदान मिळाल्याने कोरोना योद्ध्यांच्या यादीत या सेंटर मधील सर्वांचे स्थान अत्युच्च ठरले आहे.
तब्बल 137 दिवस अविरतपणे सुरु असलेल्या घोडावत कोवीड सेंटरमध्ये जवळपास तेरा हजार रुग्णांची तपासणी झाली आहे. यामध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या व नसलेल्यांचा समावेश आहे . आज अखेर 6921 रुग्णांवर येथे उपचार झाले असून त्यातील 6720 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत . तर अन्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत . याची दखल घेऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी , पदाधिकारी , आधिकारी यांनी डॉ. उत्तम मदने यांचे कौतुक केले आहे
येथे व्हीटीएम लेबलींग , स्वॅब कलेक्शन , पॅकिंग , आरटीपीसीआर,आयसीएमआर , सॉफ्टवेअर ऑनलाईन एट्री , आदि तपासणी , उपचार व स्वच्छता , साफसफाई सेवा सुरू आहे . यामध्ये सेंटरवरील डॉ. हर्षल शिखरे यांच्यासह अन्य सर्व डॉक्टर्स , त्याचबरोबर सागर पोवार , रूपल पांढरपट्टे , संभाजी टोपकर , खलील खतीब , नितीन चौगुले , मयुरी मोरो, क्रांती कांबळे, मनीषा जाधव , अविनाश जाधव , यांच्यासह संदीप कुंभार , मारुती लेंगरे , विशाल कांबळे , सुलतान मोकाशी , अभिनंदन खोत तसेच सेंटरवर काम करणारे नर्सिग स्टाफ , साफसफाई कर्मचारी , अनेक ज्ञात-अज्ञात कर्मचारीवृंद (नजरचुकीने कोणाचे नाव राहिले असेल ते सर्व ) यांची मोलाची सेवा अविरतपणे सुरु आहे .
रुग्ण दाखल झाल्यापासून बरा होऊन घरी जाईपर्यंत प्रत्येकाला समजावून सांगून आधार देण्याचे मौलिक कार्य येथील सर्वजण करीत असल्यामुळे येथील खरे कोरोना योद्धे हेच आहेत यात शंकाच नाही .

विमल जिनगोंडा पाटील , (वय वर्ष -72 , रा. किणी ता. हातकणंगले )
मला श्वास घ्यायला त्रास होत होता, अशक्तपणा होता. निमोनिया झाला आहे. असे डॉक्टरांनी सांगितले होते. माझा मुलगा मला वडगाव व कोल्हापुरातील अनेक दवाखान्यात घेवुन गेला . पण कुठेही बेड नसल्याचे सांगून अॅडमिट करून घेतले नाही . शेवटी रात्री दहा वाजता घोडावत कोवीड सेंटरमधील डॉ. मदने यांनी अॅडमिट करून घेतले , माझ्यावर उपचार करून पुढील उपचारांची माझी योग्य सोय केली.