जिल्हा बँकेला २४२ कोटींचा नफा

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या थक वर्षात २४२ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून ठेवी ९४६ कोटीवर गेल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. बँकेचा एकूण कार्यक्षम कारभार पाहता हाच नफा पुढच्या आर्थिक वर्षात ३०० कोटीवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकरी बात सभासदांचा विश्वास आणि बँकेच्या कारभारावर हे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. नऊ हजार कोटी रुपयाच्या बँकेत ठेवी आहेत. सहा हजार नऊशे कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप झाले आहे. हे कर्ज अल्पमुदत पीक, खावटी, दूध व्यवसाय, शेळी मेंढी पालन, मत्स्य व्यक्साय, कुक्कुटपालन, मधमाशी पालन अशा शेतीच्या सर्व पूरक उद्योगांसाठी शेतकऱ्यांना उपयोगी पडले आहे. महिला विकास कक्षामार्फत ३० हजार बचत गटांना कर्ज वाटप केले आहे.
ते म्हणाले, शेतकऱ्यांना कमी व्याज दरात गुंतवणूक स्वरूपाच्या मुदती कर्जपुरवठ्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचन योजना जमीन सुधारणा शेतकरी गोठा विकास योजना पशुपालन शैक्षणिक गृह कर्ज वाहन खरेदी व प्रकल्प कर्जाकरता. वाटप केले आहे. बँकेने स्वभांडवलातून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचा दोन लाख रुपयांचा अपघात विमा उतरवला असून आजअखेर ४६ शेतकरी सभासदांचे प्रस्ताव विमा कंपन्यांकडे सादर करण्यात आले आहे. ते म्हणाले, बँकेच्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेमध्ये सात संस्थांनी सहभाग घेतला. त्यापैकी चार संस्थांनी तडजोड रक्कम १२७ लाख पूर्ण भरून कर्ज खाते निरंक केले आहे. इतर तीन संस्थांनी तडजोड रकमेपोटी २८८ लाख इतकी रक्कम बँकेकडे जमा केली आहे. बिगर शेती संस्थेकडून आर्थिक वर्षात दौलत कारखान्याची हप्ता रक्कम ८२० लाख व इतर संस्थांच्याकडून ४२० लाख अशी एकूण बाराशे ४१ लाख इतकी वसूल झाली आहे. बँकेचे आयटी विभाग पूर्ण सक्षम आहे., बँकेच्या सर्व ग्राहकांना एटीएम कार्डद्वारे रोख रक्कम काढता येते. सीआरएम मशीनद्वारे ग्राहकांना रोख रक्कम काढता येते तसेच भरता देखील येते. सर्विस अंतर्गत पासबुक प्रिंटर ही एक स्वयंचलित यंत्रणा बँकेत राबवण्यात येत आहे.
अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, बँकेत मार्च २०२४ अखेर १२१५ कायम व २०५ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. २०१८ च्या सेवा कायद्यानुसार १६०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या कार्यरत कायम कर्मचारी १२१५ असून आणखी ४१७ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. ईपीएस वाढीव पेन्शनचा राज्यात पहिला मान आपल्या जिल्हा बँकेला मिळाला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बँकेच्या एका कर्मचाऱ्यास दरमहा ३००० रूपये पेन्शन वरून १४ हजार रुपये पेन्शन रकमेचा लाभ मिळाला आहे.

error: Content is protected !!