हॉटेल अ‍ॅकॉर्डवर छापा , सहा संशयित ताब्यात ; तब्बल सव्वाचोवीस लाखाचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी / प्रतिनिधी
    बेकायदेशीर तीन पानी पत्त्याचा जुगार खेळताना यड्राव (ता.शिरोळ) येथील पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मधील हॉटेल अ‍ॅकॉर्डवर येथे छापा टाकण्यात आला . छाप्यात तब्बल 24 लाख 25 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये रोख रक्कम रुपये 3 लाख 24 हजार आठशे रुपयेचा समावेश असून चार चाकी तीन गाड्या व 6 मोबाइल हँडसेट चा समावेश आहे . ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पोलीस उपनिरीक्षक इकबाल महात पोहेकॉ. महेश कांबळे , संग्राम खराडे , सचिन चौगुले , विक्रम शिंदे व खाडे यांनी ही कारवाई केली. जप्त केलेला मुद्देमाल शहापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

    कारवाईमध्ये जुगार खेळणारे संशयित संतोष गोपाळ शेट्टी (वय वर्ष-53 , रा. कापड मार्केट इचलकरंजी ) , विनोद बापू चव्हाण (वय वर्ष -49 , रा. रणझुंजार चौक , गावभाग , सांगली ) , नासिर हुसेन बशीर अहमद नदाफ (वय वर्ष -48 , उदय हॉटेल समोर , रामनगर , कोल्हापूर रोड , सांगली ) , विशाल बाळासाहेब माळी (वय वर्ष – 35 , कबाडे हॉस्पिटलच्या मागे , सांगली ) , संतोष मनोहर खामकर (वय वर्ष -45 रा . सातवी गल्ली , खामकर मळा , जयसिंगपूर ) , रमेश विश्वनाथ बावचे (वय वर्ष -33 रा . आगर ,ता . शिरोळ ) या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे‌.

error: Content is protected !!