जंगल परिसरातील दारु अड्ड्यावर पोलिसांची धाड ; सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त , तीन गुन्हे दाखल …..

गारगोटी /आनंद चव्हाण
      भुदरगड, आजरा, राधानगरी, कागल तालुक्याला गावठी दारू जिथून पुरवली जाते . त्या जंगल परिसरातील देवकेवाडी ता. भुदरगड येथे गावठी दारू अड्ड्यावर भुदरगड पोलिसांनी धाड टाकली, या धाडीत दारू तयार करण्यासाठीचे लागणारे रसायन, प्लास्टिक टाक्या ,मोटारसायकली असा सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला, आणि तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  देवकेवाडी (ता भुदरगड ) येथे दारू अड्ड्यावरील रसायन नष्ट करतांना भुदरगड पोलीस स्टाफ …

        लॉकडाउनच्या काळात अवैध दारू विक्री व गावठी दारू अड्डे यावर धाडी टाकण्याचे सत्र भुदरगड पोलिसांनी अवलंबले असून परवा नांदोली व शेळोली येथे ४० हजाराची गोवा बनावटीची दारू पकडल्यानंतर भुदरगड पोलिसांनी गावठी दारू अड्ड्याकडे मोर्चा वळवला आहे, आज दुपारी पोलिसांनी देवकेवाडी येथे जंगल परिसरात असणाऱ्या तीन दारू अड्ड्यावर धाड टाकली. हे दारुअड्डे दिपक बाजीराव पोर्लेकर, ( वय ३५ रा देवकेवाडी ), विजय एकनाथ येरम ( रा. देवकेवाडी ), हे व अन्य साथीदार चालवत होते, या धाडीत ११ हजार १०० लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन, जप्त करून नष्ट करणेत आले. प्लास्टिक टाक्या, घागरी, दोन मोटारसायकली असा एकूण ६,९७,३५० /- रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला. व संबंधितांवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
      पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख व इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.

error: Content is protected !!