हातकणंगले / प्रतिनीधी
मजले (ता.हातकणंगले) येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष कोठावळे यांना राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आशिष कोठावळे हे सामाजिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आहेत. कोरोना काळातही त्यांनी विषेश योगदान दिले आहे .

कोठावळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले . यावेळी बोलताना आशिष कोठावळे यांनी आपल्याला मिळालेल्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने आपल्याला सामाजिक , शैक्षणिक , क्षेत्रात कार्य करण्यास उर्जा मिळाल्याचे तसेच या पुरस्काराचे सर्व श्रेय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्वच शिलेदारांना जाते असे त्यांनी सांगितले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री विद्या करंजीकर, प्रसिद्ध कॅन्सरविकारतज्ञ डॉ.राज नगरकर, प्रसिद्ध मॉडेल कलाकार प्रिय सुरते, भारत विकास प्रबोधिनीचे विजय इंगळे, सेंट्रल बँक ऑफ़ इंडियाचे शाखाधिकारी अनिल कोठावळे, नागेश कोठावळे तसेच सर्व विभागातील पुरस्कार्थी उपस्थित होते. मजले सारख्या छोट्याश्या गावातील युवकाला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब असून आशिष कोठावळे यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
