नवे पारगाव /प्रतिनिधी

नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील डॉ.सुधाकरराव कोरे महात्मा गांधी चॅरिटबल मेडिकल ट्रस्ट कामगार पत संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.शिल्पा नितीन कोठावळे यांची निवड झाली. महात्मा गांधी मेडिकल समूहाचे प्रमुख व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.डॉ. सुधाकरराव कोरे यांचे निधन झाल्याने रिक्त जागी त्यांची निवड झाली आहे.
अध्यक्षपदी निवडीसाठीच्या बैठकीत सचिव विद्याधर कांबळे यांनी विषयवाचन केले. डॉ.शिल्पा कोठावळे यांचे नाव संचालक भगवान पाटील यांनी सूचविले. त्यास अशोक पाटील यांनी अनुमोदन दिले.
यावेळी उपाध्यक्ष अरुण कुंभार,संचालक भगवान पाटील,अशोक पाटील,सुधीर जाधव,पांडुरंग वाघमोडे, धोंडिराम भाळवणे हेमलता पोवार, महेश घेवारी उपस्थित होते. तानाजी गराडे यांनी आभार मानले.