पेठवडगाव / प्रतिनिधी :
वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी काँग्रेसचे व आमदार आवळे गटाचे कट्टर कार्यकर्ते चेतन संपतराव चव्हाण (सावर्डे)यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांच्यासह १८ जणांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.न्यायालयीन प्रक्रियेमुळे मंडळाची नियुक्ती थांबली होती.अखेर शासनाने आज अशासकीय मंडळाची यादी जाहीर केली.
यामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश झाल्यामुळे समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत प्रचंड जल्लोष केला.

आमदार राजुबाबा आवळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा. तसेच व्यापारी यांचे प्रश्न सोडवून लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न नवीन प्रशासक मंडळाने करावा. यापुढे महाविकास आघाडी करून सर्वच निवडणूक लढवायच्या आहेत. बाजारसमितीवरही निवडणुकीच्या माध्यमातून विजय संपादन करून सत्ता संपादन करायची आहे.
या निवडीकामी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.
यावेळी नुतन सभापती चेतन चव्हाण, प्रदीप मालगावे, प्रा.बी.के.चव्हाण, एम.के.चव्हाण, रणजित यादव, फिरोज बागवान,शशिकांत पाटील,डी. बी.पिष्टे,सुहास माने,सात्तापा भवान यांची भाषणे झाली.
सभेस काँग्रेसचे सचिन चव्हाण,धोंडीराम पाटील रमेश पाटोळे,कपिल पाटील, नितिन सनगर, सुरज जमादार, पिंटू रावळ आदी उपस्थित होते.आभार सचिव आनंदराव पाटील यांनी मानले.
चौकट-बाजार समितीवर अनेक वर्षे महाडिक गटाची सत्ता होती.पण प्रशासक मंडळाच्या माध्यमातून महाडिक गट वगळून महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे.आवळे गटाला मुख्य प्रशासक पद मिळाल्याने नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
नवनियुक्त प्रशासक मंडळ –
नवनियुक्त अशासकीय प्रशासक मंडळ
चेतन संपतराव चव्हाण रा.सावर्डे (मुख्य प्रशासक)
भैरवनाथ ज्ञानू पोवार रा. खोची
सचिन लालासो कोळी रा. कुंभोज
रणजितसिंह जयसिंगराव यादव रा.पेठवडगाव
उत्तम भिमराव पाटील रा. शिरोली
नानासो पक्कड गाठ रा. हुपरी
दशरथ बळवंत पिष्टे रा.कोरोची
मधुकर कष्णा चव्हाण रा.खोची
गुंडा शंकर इरकर रा. हातकणंगले
फिरोज अजीज बागवान रा.पेठवडगाव
रावसो शामू चौगुले रा.आळते
सुहास सर्जेराव माने रा.किणी
अँड.महिपती आत्माराम पाटील रा.रेंदाळ
श्रीधर बंडु पाटील रा.अतिग्रे
सुर्यकांत भाऊसो यादव रा.शिरोली
शशिकांत पंडित पाटील रा.लाटवडे
रमेश बापुसाहेब देसाई रा.पट्टणकोडोली
प्रकाश रघुनाथ जाधव रा.पट्टनकोडोली
अनिल सर्जेराव जमादार रा. भादोले
