कोयनेतुन आज सकाळी 25000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु

पाटण /ता .१६ विक्रांत कांबळे

         महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसापासुन पावसाची संततधार सुरूअसुन जलाशयच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे . धरणात सध्या 87.68 tmc पाणी साठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसचे प्रमाण गेल्या कालपासुन वाढले आहे.  पाण्याची आवक पहाता आज रविवार  दि. 16/8/20 रोजी सकाळी 10 वाजता एकूण विसर्ग 25000 क्युसेक्स करावा लागेल. नदीकाठच्या लोकांनी कृपया दक्षता घ्यावी.असे आवाहन कोयना धरणाचे अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे
     कोयना धरण परिसरात गेल्या आठ दीवसा पासुन  पावसाची संततधार चालु असुन कोयना धरणाची पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने शनिवारी १५ आँगष्ट रोजी सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रद्वारे 1 फूट 9 इंच उचलण्यात आली आहेत. सांडव्या वरून 9360 क्युसेक्स व धरण पायथा वीजगृह मधून 1050  क्युसेक्स असा एकूण 10410 क्युसेक्स पुराच्या पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला होता . शनिवारी कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम राहील्याने  कोयना धरणात सध्या 88 .1 tmc पाणी साठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसचे प्रमाण गेल्या 4 तासात वाढले आहे.  पाण्याची आवक पहाता आज रविवार  दि. 16/8/20 रोजी सकाळी 10 वाजता एकूण विसर्ग 25000 cusecs करावा लागेल. नदीकाठच्या लोकांनी कृपया दक्षता घ्यावी.

 सध्या धरणाची पाणी पातळी 2150’01″(655.345mतर 88.01 TMC (83.62%)
Live storage= 82.88 TMC
पाण्याची आवक 91714 क्युसेस होत आहे तर पायथा विजगृहातुन 2100क्युसेस तर सहा वक्र दरवाजे 1.6 “  उचलण्यात आल्याने 8573 क्युसेस असे एकुन धरणातुन 10663 क्युसेस पाणि प्रतिसेकंद सोडण्यात येत आहे व्यवस्थापन गेल्या 4 तासात महाबळेश्वर येथे 61 mm तर नवजा येथे 90 mm पाऊस झाला आहे. सध्या
कोयना येथे = 100/ एकुण 3247
नवजा येथे 145/ एकुण 3596
महाबळेश्वर येथे = 124 एकुण 3629 पाऊस पडल्याची नोंद झाली आहे .

error: Content is protected !!