हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील जिल्हा स्मार्टग्राम पुरस्कार प्राप्त माणगाव ग्रामपंचायतीच्या कर्माचा-यांना दीपावली बोनस म्हणून चार महिन्याचा पगार व दीपावली महिन्याचा अडव्हान्स पगार देणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली माणगाव ग्रामपंचायत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव ग्रामपंचायतीच्या अठरा कर्मचा-यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मार्च महिन्या पासून कोरोना या महामारीला रोखण्यासाठी गावामध्ये अहोरात्र झटले आहेत.

या कामाचा विचार करून तत्कालीन सरपंच , उप सरपंच व सदस्य , सदस्या यांनी ग्रामपंचायतीची मुदत जुलै ऑगस्टला संपणार असल्याकारणाने ग्रामपंचायतीवर प्रशासक येणार हे गृहीत धरून ३०/०६/२०२० च्या मासिक मिटिंग मध्ये कर्मचा-यांना चार पगार बोनस बाबत ठराव करून ठराव सर्वानुमते मंजूर केला होता . त्या अनुषंगाने आज ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. एन. के. कांबळे यांच्या सोबत पदाधिकारी व कर्मचारी यांनी चर्चा केली व झालेला ठराव दाखविला तसेच बोनसच्या रक्कमेसाठी केलेल्या तरतुदीची माहिती दिली. त्यास प्रशासक यांनी मान्यता दिली व कर्मचा-यांना दिवाळीसाठी चार पगार बोनस व एक अडव्हान्स पगार देत असल्याचे घोषणा केली . या वेळी गावचे जेष्ठनेते माजी सरपंच जिनगोंडा पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.बी. राठोड, माजी उपसरपंच राजू मगदूम, माजी उपसरपंच राजू पाटील, माजी सदस्य राजकुमार कोळी, अमोल मगदूम, शिवाजी जोग, दत्तात्रय बन्ने, प्रवीण कांबळे तंटामुक्ती माजी अध्यक्ष अख्तर भालदार, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते . यावेळी ग्रामपंचायतीचे मुख्य क्लार्क मायाप्पा रूपणे आभार यांनी मानले