संविधानामुळे देश एकसंघ -डॉ. मिणचेकर ;२६/११च्या हल्यातील शहिदांना वाहिली आदरांजली …..

हातकणंगल / प्रतिनिधी
      संविधानामुळेच आपला देश एकसंघ असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान हा देशातील सर्व लोकांना असला पाहिजे , असे प्रतिपादन माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी हातकलंगले येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित संविधान दिना निमित्त कार्यक्रमात केले.

      यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मुंबईमध्ये २६/११ रोजी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना व नागरिकांना आदरांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर भारताचे संविधानाचे पूजन करून त्याचे सामूहिक वाचन करण्यात आले.
      याप्रसंगी मा . आम. डॉ. सुजित मिणचेकर, संजय चौगुले, शिवाजी वाघरे, बाबुराव जाधव, रणजित शिंदे, विद्याधर खोत, प्रवीण मिणचेकर, अभिजित कोळी, रमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!