वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कामकाज सर्वोत्कृष्ट असल्याचा अभिप्राय

वारणानगर /प्रतिनिधी
      वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कामकाज सर्वोत्कृष्ट असल्याचा अभिप्राय ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या प्रशासकीय अधिकारी मेजर गुगामालती यांनी दिला आहे. कोरोना कालखंडामध्ये छात्र सैनिकेनी केलेल्या कामाचा लेखी अहवाल यावेळी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचा अहवाल महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या प्रशासकीय अधिकारी मेजर गुगामालती यांना सुपूर्त करताना प्रभारी प्राचार्य डॉ.प्रकाश चिकुर्डेकर सोबत लेफ्टनंट सौ. जयंती गायकवाड .

    राष्ट्रीय छात्र सेना मुलींच्या नव निवड प्रक्रिये निमित्त बटालियनचे लष्करी अधिकारी संतोष सिंग व विजय मेंडगे यावेळी उपस्थित होते. त्यांनी १९ विद्यार्थिनींची विविध परीक्षांच्या आधारावर निवड केली. निवड झालेल्या विद्यार्थिनींचे श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आम.डॉ. विनय कोरे सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ. वासंती रासम यांनी अभिनंदन केले.
   सध्या महाविद्यालयांमध्ये ५२ विद्यार्थिनींचे युनिट कार्यरत आहे. देशभर संपन्न होत असलेल्या विविध ठिकाणच्या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थिनींनी राष्ट्रीय छात्र सेना कॅम्प, सांस्कृतिक विभाग, खेळ, विविध कौशल्याच्या माध्यमातून चमकदार कामगिरी केली आहे.
     अध्यक्षीय समारोपात प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून मुले आणि मुलींनी गेल्या पंचवीस वर्षात सातत्याने यशोशिखरे गाठली आहेत. प्रजासत्ताक संचलनात ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून चमकदार कामगिरी केली आहे, याचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळवताना राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रशिक्षणाचा आणि अनुभवाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे.
यावेळी 56 महाराष्ट्र बटालियनचे कॅप्टन डॉ.सुधाकर खोत, प्रबंधक बाळासाहेब लाडगांवकर उपस्थित होते.लेफ्टनंट जयंती गायकवाड यांनी आभार मानले.

error: Content is protected !!